राजेंद्र म्हापसेकर यांच्या आश्वसनानंतर उपोषण मागे

राजेंद्र म्हापसेकर यांच्या आश्वसनानंतर उपोषण मागे

वैद्यकीय अधिकारी मिळावा यासाठी सुरू होते प्रदीप नाईक यांचे उपोषण

दोडामार्ग

साटेली भेडशी आरोग्य केंद्रात तज्ञ वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांचे सुरू असलेले उपोषण अखेर जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या यशस्वी शिष्ठायी नंतर मागे घेण्यात आले. जवळ असलेल्या उपकेंद्रातील डॉक्टर नवीन डॉक्टर या ठिकाणी रुजू होईपर्यंत सेवा देतील तर १ फेब्रुवारीपासून याठिकाणी कायमस्वरूपी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक होईल असे आश्वासन यावेळी श्री म्हापसेकर यांनी दिले. यावेळी श्री म्हापसेकर यांसह साटेली भेडशी सरपंच लखु खरवत उपसरपंच सूर्यकांत धरणे, सदस्य गणपत डांगी, यांसह रुपेश दळवी, संतोष परमेकर, सुरेश राठोड,वैभव सुतार,राजु धर्णे,सुनिल राणे आदी उपस्थित होते. तर रमेश दळवी यांनीही उपोषणाला भेट देत पाठींबा दर्शवला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा