You are currently viewing भांडुपच्या शिवाई विद्यामंदिर शाळेत उत्साहात ध्वजारोहण सोहळा संपन्न !

भांडुपच्या शिवाई विद्यामंदिर शाळेत उत्साहात ध्वजारोहण सोहळा संपन्न !

मुंबई :

 

देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तसंच समाजात बदल घडावा म्हणूनही कित्येकांनी सहभाग नोंदविला यात माझे वडील डॉ.केशव गणपत कोळी आणि काका काशिनाथ गणपत कोळी अशा महान व्यक्तीमत्वांनी देशासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं असे डॉ. रंजना तामोरे यांनी विद्यावैभव शिक्षण मंडळ संचालित शिवाई विद्यामंदिर शाळेत आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. प्रारंभी संस्थेच्या उपसचिव डॉ. रंजना तामोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आठवणींना उजाळा दिला. यावेळी दहावी, बारावीच्या गुणवत्तावान विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करून सन्मान केला. याप्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ आशा ताजणे शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख उंचावत असल्याचे नमूद करताना सांगितले की, संस्थापक.कै. सदाशिव भोईर सरांनी आम्हाला जी मार्गदर्शक तत्त्वं घालून दिलेली आहेत, त्यानुसार आमची वाटचाल सुरू आहे. यावेळी छोट्या विद्यार्थ्यांनी कांतीकारकाविषयी व्यक्त होताना या भूमिकेच्या माध्यमातून विचारांची ताकद दाखवून देताना स्वातंत्र्य संग्रामात अनेकांनी बलिदान दिल्याचे सांगितले. शाळेच्या सहशिक्षिका अश्विनी कानोलकर यांनी स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने प्रगती साधली असल्याचे विषद करून देशासमोर पुढील आव्हाने उभी राहिली असताना अद्याप आपल्यावर होणारे अत्याचार थांबलेले नाहीत याबाबत चिंता व्यक्त केली. शाळेच्या संस्थापिका तथा सचिव गौरी भोईर, शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन संपतराव गोळे, पर्यवेक्षक रत्न भालेराव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ आशा ताजणे, पत्रकार प्रमोद कांदळगावकर, भांडुपगाव पुजा समितीचे नरेंद्र पवार, सहशिक्षिका विनिता परब आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा भाबल यांनी अतिशय सुबक शब्दात केले. तर आभारप्रदर्शन संजय झनके यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा