You are currently viewing शिरोडा ग्रामपंचायत च्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार

शिरोडा ग्रामपंचायत च्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचा शिरोडा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
शिरोडा ग्रामपंचायत सदस्या समृद्धी धानजी, प्राची नाईक,वेदिका शेट्ये यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सरपंच मनोज उगवेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व उपसरपंच राहुल गावडे, सदस्य कौशिक परब , दिलीप गावडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन दिपक केसरकर यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर , उपसरपंच राहुल गावडे , कौशिक परब यांनी केसरकर साहेब यांच्याशी चर्चा करताना पर्यटन विकास कामासंदर्भातील पायाभूत सुविधांची मागणी संदर्भात शिरोडा नियोजित गांधी स्मारक प्रस्ताव , बस स्थानक नूतनीकरण , वेळागर रस्ता , धुप प्रतिबंधक बंधारे तसेच वेळागर येथील शिरोडा ग्रामपंचायत ने पर्यटन विकासासाठी मागणी केलेली जागा , शिरोडा हॉस्पिटल रिक्त जागा , मराठी केंद्रशाळा इमारत याविषयी निवेदने सादर करताना महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली . ग्रामपंचायत मध्ये भाजप पदाधिकारी लक्ष्मीकांत कर्पे , श्रीकृष्ण धानजी , माजी सरपंच राजन गावडे , दिलीप मठकर, अमित गावडे व ग्रा पं कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केसरकर यांचे आभार मानताना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =