You are currently viewing गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे भाजपात उत्साह; जिल्हाध्यक्ष राजन तेली

गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे भाजपात उत्साह; जिल्हाध्यक्ष राजन तेली

राणेंच्या हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमुळे जिल्हात आरोग्य क्षेत्रात विकास

कणकवली
भारताचे गृहमंत्री अमित शहा शनिवार ६ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे भजपात उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले आहे. जिल्हा भाजपमय करण्याचा निर्धार केला आहे. राणे साहेबांच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज ही मोठी देणगी जिल्ह्यातील जनतेला मिळाली आहे. आरोग्य व्यवस्था दयनीय असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे मेडिकल कॉलेज म्हणजे विकासाची मोठी भर पडली आहे. असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोणीही राजकारण करु दे,   मात्र राणेंचे मेडिकल हॉस्पिटल आणि कॉलेज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र विकास घडविणार आहे. आज जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बिकट आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात 536 डॉक्टर आणि कर्मचारी पदे रिक्त आहेत. या मेडिकल कॉलेज मुळे वर्षाला 150 डॉक्टर जिल्ह्यात तयार होणार आहेत. शासनाकडे आज गाड्या चालविण्यासाठी डिझेल नाही अशी स्थिती आहे. आज टीका करणाऱ्यांना सुद्धा हे हॉस्पिटल उपयोगी ठरेल. असा विश्वास यावेळी राजन तेली यांनी व्यक्त केला.

यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांचा दौऱ्या झालेला नाही त्यामुळे भाजपाच्या प्रत्येकासाठी हा महत्वाचा दौरा आहे. वीज मंत्र्यांनी आणि शासनाने विजमाफीची आश्वासन देऊन जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी उद्या 5 फेब्रुवारी रोजी भाजपा आंदोलन करणार असल्याचे राजन तेली यांनी सांगितले. एल्गार परिषदेत विखारी वक्तव्य करणाऱ्या शरजिल उस्मानी यांच्या त्वरित अटकेची मागणी भाजपच्या वतीने केली जाणार आहे. महाराष्ट्रात येऊन असे वक्तव्य करून सुद्धा त्याला पळून जाण्यास वेळ दिला. आज हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे त्याला त्वरित सरकारने अटक करावी अशी मागणी राजन तेली यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + five =