You are currently viewing महावितरणचे अधिक्षक अभियंता २७ जूनला वीज ग्राहकांच्या बैठकीस दोडामार्ग कार्यालयात उपस्थित राहणार

महावितरणचे अधिक्षक अभियंता २७ जूनला वीज ग्राहकांच्या बैठकीस दोडामार्ग कार्यालयात उपस्थित राहणार

वीजनिर्मिती होणा-या महालक्ष्मी कंपनीचा संपलेला करार होणार का ?

दोडामार्ग : वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग तर्फे शुक्रवार दिनांक २७ जून रोजी सकाळी ११ वाजता दोडामार्ग वीज कार्यालय येथे वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिक्षक अभियंता सिंधुदुर्ग उपस्थित राहणार आहेत. यावेळी तालुक्यातील सरपंच, सदस्य व वीज ग्राहकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना दोडामार्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.

दोडामार्ग तालुक्यात तिलारी धरणाच्या माध्यमातून कोनाळ महालक्ष्मी कंपनीचा करार संपल्याने गेले तीन वर्ष दोडामार्ग तालुक्यात वीज पुरवठा होत नसल्याने अनेक वीज ग्राहक हैराण झाले आहेत. गोवा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचा संयुक्त तिलारी आंतरराज्य प्रकल्प आहे. त्या प्रकल्पा अंतर्गत गोवा राज्याला वीज पुरवठा सुरू आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने अद्यापही हा करार का केला नाही असा सवाल सातत्याने दोडामार्ग तालुक्यात उपस्थित होत आहे. त्या अनुषंगाने दोडामार्ग तालुका निर्मितीस २७ जूनला २५ वर्षे पूर्ण होत आहे. त्या धरतीवर सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना व दोडामार्ग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २५ वर्ष दोडामार्ग वासियांना हा करार पुन्हा होऊन वर्धापन दिनानिमित्त एक खास गिफ्ट मिळेल का यासाठी वीज ग्राहक अपेक्षित आहेत. हा करार झाला तर दोडामार्ग तालुक्यातील वीज प्रश्न निश्चित स्वरूपात सुटणार आहे. यासाठी वीज ग्राहकांनी उपस्थित रहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा