You are currently viewing पुस्तकांना कव्हर ( बाल कविता )

पुस्तकांना कव्हर ( बाल कविता )

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पुस्तकांना कव्हर* (बाल कविता)

 

वर्गात माझी

वाढेल पॉवर

पुस्तकांवर दिसेल

मस्त कव्हर

 

रंगीत सुंदर

ग्लॉसी पेपर

त्यावर बहारदार

चित्रे सुंदर

 

महान व्यक्तींना

देईन स्थान

त्यांचाच आधी

ठेवेन मान

 

बेलाघ गड किल्ले

इतिहासात नेतील

शोर्य धैर्याची

प्रेरणा देतील

 

दुर्मिळ पक्षी

झळकत राहतील

शाळेत सुध्दा

सोबत करतील

 

सुंदर फुले

शोभा देतील

मन नेहमी

प्रसन्न करतील

 

अग्रस्थानी असतील

छान सुविचार

मनात पेरतील

उच्च विचार

 

सुवाच्य अक्षरांत

वर नाव अन पत्ता

सांगेल पुस्तकांवर

माझीच सत्ता

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा