You are currently viewing मळेवाड येथे ३ नोव्हेंबरला नरकासूर स्पर्धा…

मळेवाड येथे ३ नोव्हेंबरला नरकासूर स्पर्धा…

सावंतवाडी

मळेवाड-कोंडूरे ग्रामपंचायत आणि युवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ३ नोव्हेंबरला मळेवाड-कोंडूरे गाव मर्यादित नरकासुर स्पर्धा व आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी इच्छुकांनी सहभाग घेण्यासाठी आपली नावे ग्रामपंचायत कार्यालयात नोंदवावीत,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नरकासुर स्पर्धेसाठी प्रथम 3333 व चषक,द्वितीय —2222 व चषक,तृतीय — 1555 व चषक बक्षिसे देण्यात येणार आहेत.तर
आकाश कंदील स्पर्धेसाठी प्रथम 1001 व चषक,द्वितीय —701 व चषक,तृतीय — 501 व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
आकाश कंदील स्पर्धा ही संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत होईल.तर नरकासूर स्पर्धा रात्री ८ ते १० या वेळेत होईल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. या स्पर्धा मळेवाड जकातनाका चौकात आयोजीत केल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =