You are currently viewing कट्टर शिवसैनिक विरोधकांच्या आमिषांना भुलणार नाहीत-अमरसेन सावंत

कट्टर शिवसैनिक विरोधकांच्या आमिषांना भुलणार नाहीत-अमरसेन सावंत

*कट्टर शिवसैनिक विरोधकांच्या आमिषांना भुलणार नाहीत-अमरसेन सावंत*

*येत्या काळात कुडाळ मधील उर्वरित विकास कामे मार्गी लावणार -आ. वैभव नाईक*

*शिंदे-फडणवीस सरकारला निवडणुकीत जनताच जागा दाखवेल- संजय पडते*

*बांव,सोनवडे येथे आ. वैभव नाईक यांचा गाव भेट दौरा संपन्न*

कुडाळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना देखील अनेक आमिषे दाखवली जात आहेत.सत्तेच्या जोरावर विकास कामांची खोटी आश्वासने दाखवली जात आहेत. मात्र कट्टर शिवसैनिक विरोधकांच्या आमिषांना भुलणार नाही. जरी आता आपला पक्ष सत्तेत नसला तरी येत्या निवडणुकीत राज्यात शिवसेनेचा भगवा फडकणार असून शिवसेना पुन्हा सत्तेत येणार आहे.सर्वसामान्यांचे आमदार म्हणून वैभव नाईक परिचित आहेत.तळागाळातील जनतेपर्यंत त्यांनी पोहचुन लोकांची कामे मार्गी लावली आहेत त्यामुळे जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी सांगितले.
बांव व सोनवडे येथे आमदार वैभव नाईक यांचा गाव भेट दौरा गुरुवारी संपन्न झाला.यावेळी आयोजित बैठकांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी सांवाद साधत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
आमदार वैभव नाईक म्हणाले, सर्वसामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने दोन वेळा मला आमदार म्हणून निवडून दिले. या जनतेसाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा राहिला आहे. आणि पुढील काळातही करीत राहणार आहे.जनतेचे माझ्यावर असलेले प्रेम, विश्वास यामुळेच अधिक काम करण्याची उर्जा मिळते. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे पूर्ण झाली.येत्या काळातही कुडाळ मधील उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविला जात आहे. शिवसेना पदाधिकरी आणि शिवसैनिकांनी संघटना वाढीसाठी मेहनत घ्यावी. असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाप्रमुख संजय पडते म्हणाले, महागाईमुळे देशात आणि राज्यात भाजप विरोधी वातावरण आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार स्थापन केल्याने जनतेच्या मनात देखील रोष आहे. याचा उद्रेक निवडणुकीत होणार आहे याची जाणीव शिंदे फडणवीस सरकारला असल्यानेच राज्यात निवडणूका घेतल्या जात नाही. या सर्व घटनांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र जनता निवडणुकीत या सर्वाना जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले.

बांव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी उपसभापती जयभारत पालव, पावशी विभाग प्रमुख दीपक आंगणे, बाळू पालव, बांव सरपंच अनंत आसोलकर, उपसरपंच सुजाता बावकर, ग्रा. प. सदस्या गौरी सामंत, ग्रा. प. सदस्या साक्षी परब,स्वामिनी परब, दिपश्री राऊत, नागेश करलकर,मधू मांजरेकर, संदेश सामंत, शंकर मयेकर,झिलू आसोलकर, अश्विनी आसोलकर, पूर्वा परब, सुचिता राऊत, प्रमोदिनी तुळसकर, सुधीर राऊत, विलास सामंत,प्रीती सावंत, शैलेश कदम,सत्यवान जळवी, समेधा राऊत, संचिता करलकर, समिधा दळवी आदी.
सोनवडे येथे शाखा प्रमुख अजित शिरोडकर, ग्रा. प. सदस्य बाबू शिरोडकर,ग्रा. प. सदस्य शामू शिरोडकर,ग्रा. प. सदस्या मानसी जावकर, मिथुन जावकर,माजी सरपंच वनिता सानेकर, किशोर शिरोडकर,राकेश राऊत, युवासेना शाखा प्रमुख संदीप बळी, शालिनी सारंग, सूर्यकांत शिरोडकर, लक्ष्मी कांबळी, गीतेश धुरी आदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा