You are currently viewing पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी घेतली दत्तक

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी घेतली दत्तक

भाजप कणकवली तालुका महिला मोर्चाचा उपक्रम

कणकवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिसानिमित्त भाजपच्या महीला मोर्चाच्यावतीने प्रत्येक मंडल स्तरावरील एक अंगणवाडी दोन महीन्याच्या कालावधी करीता देण्यात आली.
प्रत्येक मंडलात १ अंगणवाडी दत्तक घेऊन त्या ठिकाणी विविध उपक्रम राबविणे. अंगणवाडीत स्वच्छता अभियान व वृक्षारोपण, गर्भवती महिला व मुलांना मार्गदर्शन करणे व त्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देणे, वेगवेगळ्या बैठका घेणे गर्भवती महिला, स्तनदा माता, शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी मिळणारा पोषण आहार वेळेत व दर्जेदार मिळतो का हे पाहून काही समस्या असल्यास जिल्हास्तरापर्यंत पोचवणे, तसेच वेळोवेळी आलेल्या सुचना नुसार विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

यावेळी नांदगाव केंद्र शाळा अंगणवाडी येथील बालकांसोबत केक कापून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा केला आहे.मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,प्रज्ञा ढवण,राजन , भाजप महीला तालुका अध्यक्षा हर्षदा वाळके,पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव,शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, नांदगाव उपसरपंच नीरज मोरये, ग्रामपंचायत सदस्या ईशा बिडये, वृषाली मोरजकर,शामराव परब,राजू तांबे, अवधूत गगनग्रास,समीर प्रभुगावकर,परशुराम परब, कमलेश पाटील,ऋषिकेश मोरजकर ,तालुका कार्यकारणी चिटणीस पूजा सावंत व शिक्षकवर्ग अंगणवाडी सेविका संतोषी मोरये , मदतनीस शोभा मोरये, उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा