You are currently viewing लेखक कवी विनय सौदागर यांच्या ‘सभोवताल’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

लेखक कवी विनय सौदागर यांच्या ‘सभोवताल’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

आजगाव येथे होणार कार्यक्रम

आजगाव
रविवार दिनांक २० मार्च रोजी कवी विनय सौदागर यांच्या ‘सभोवताल’ या मालवणी भाषेतील काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आजगाव येथील त्यांचे निवासस्थानी आयोजित केला आहे. विनय सौदागर यांचे हे तिसरे पुस्तक आहे. “भोवताल” या पहिल्याच काव्यसंग्रहाला भरपूर प्रतिसाद लाभल्याने आता मालवणी भाषेतील हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे.
या छोटेखानी समारंभात “सभोवताल” काव्यसंग्रहाचे प्रकाशन श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, म्हापसा-गोवाचे प्राचार्य व साहित्य संगम,मांद्रे-गोवा संस्थेचे कार्यवाह गजानन मांद्रेकर यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शासकीय विद्यालय तोरसेचे सहाय्यक शिक्षक व साहित्य संगम, मांद्रे या संस्थेचे अध्यक्ष सुभाष शेटगावकर याना निमंत्रित केले आहे. तर विशेष अतिथी म्हणून पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त व प्रसिद्ध कवी सुधाकर ठाकूर उपस्थित रहाणार आहेत.
सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास साहित्य प्रेमीनी उपस्थित रहावे असे आवाहन विनय सौदागर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − five =