You are currently viewing फोंड्याचे सुपुत्र सचिन मानकर यांची पंढरपूर वारकरी भवनासाठी ₹१,०१,१११ ची उदार देणगी

फोंड्याचे सुपुत्र सचिन मानकर यांची पंढरपूर वारकरी भवनासाठी ₹१,०१,१११ ची उदार देणगी

फोंड्याचे सुपुत्र सचिन मानकर यांची पंढरपूर वारकरी भवनासाठी ₹१,०१,१११ ची उदार देणगी

अजित नाडकर्णी कुटुंबीयांकडून मानकर यांचे अभिनंदन; भाविकांनीही या सेवाभावी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन

फोंडा :

फोंडा गावचे सुपुत्र तथा समाजाभिमुख उद्योजक श्री. सचिन मानकर यांनी पंढरपूर येथे उभारण्यात येत असलेल्या परमपूज्य भालचंद्र महाराज पायी दिंडी वारकरी भवनासाठी रु. १,०१,१११ इतकी उदार देणगी देऊन वारकरी सेवेसाठी मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांच्या या सेवाभावी आणि धर्मकार्यातील योगदानाबद्दल अजित नाडकर्णी कुटुंबीयांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, पांडुरंगाच्या चरणी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी प्रार्थना केली आहे.
यावेळी अजित नाडकर्णी यांनी, पंढरपूर येथील वारकरी भवन उभारणी हा अत्यंत पवित्र आणि समाजोपयोगी उपक्रम असून, या कार्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी व भाविकांनीही आपल्या परीने आर्थिक मदत करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा