You are currently viewing बाप्पा तू माझ्या सोबत येशील का❓

बाप्पा तू माझ्या सोबत येशील का❓

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम बालगीत*

*बाप्पा तू माझ्या सोबत येशील का*❓

बाप्पा मला एक मोदक देशील का
माझ्यासंगे फिरायला येशील का ॥धृ ॥

चौपाटीवर जाऊ भेळपुरी खाऊ
फेसाळणाऱ्या लाटांवर मौज मस्ती करू
एक सेल्फी माझ्यासोबत घेशील का
माझ्यासंगे फिरायला येशील का ॥ १ ॥

उंदरावर बसून उंच डोंगर चढू
पाय घसरून पडल्यावर नको तू रडू
डोंगरातील हवेला अडवशील का
माझ्यासंगे फिरायला येशील का ॥२ ॥

झुक झुक गाडीत बसून मुंबईला जाऊ
मॉलमध्ये जाऊन खूप खेळणी घेऊ
माझ्या घरी रोज रोज खेळशील का
माझ्यासंगे फिरायला येशील का ॥ ३ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =