You are currently viewing माझे पहिले गुरू मायबाप

माझे पहिले गुरू मायबाप

*परमहंस रामचंद्र जागतिक मराठी साहित्य संघ सदस्य कवयित्री पूजा सांगळे लिखित अप्रतिम गुरुवंदन काव्यरचना*

 

*माझे पहिले गुरू मायबाप*

 

जन्म झाला तेव्हा

आईने कुशीत घेतले

तेव्हा मातृत्वाचे दान

आईने मजला पाजले .

 

पहिलं पाऊल टाकताना

पाय जेव्हा डगमगला

तेव्हा ठामपणे उभे राहून

संकटाशी लढण्याचे ज्यांनी

ज्ञान दिले मजला .

 

जनलोकांत वावरतांना

ह्या क्रूर समाजापासून जरा जपून

त्यांच्या सोबत माणुसकीने वागण्याचे

ज्यांनी ज्ञान दीले मजला .

 

कधी हारले कधी खचले

तरी मात्र आत्मविश्वसाने उभ राहुन

सतत पुढे चालण्यास

सामर्थ्याचे ज्ञान दिले मजला .

 

जेव्हा दाटला होता घनघोर

अज्ञानाचा अंधकार

तेव्हा संज्ञानाचा दीप पेटवून

ज्यांनी मार्ग मजला दाखविला

 

ह्या मनुष्यरुपी देहाचा

मौल्यवान अलंकार

भेट देवूनी मजला

ज्यांनी हे सुंदर जग दाखविले

तेच माझे गुरू मायबाप .

 

 

– पूजा बाळकृष्ण सांगळे.

तालुका – येवला

जिल्हा – नाशिक .

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =