You are currently viewing काव्यपुष्प-५३ वे

काव्यपुष्प-५३ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वी. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

*काव्यपुष्प-५३ वे*
—————————————–
काशी यात्रेला निघण्याच्या वेळी । गीतामाईस निरोप देण्या
जमली सारी मंडळी । गीतामाई म्हणे-जरा लक्ष द्या घराकडे यावेळी । निघालोत आम्ही यात्रेला ।। १ ।।

हे शब्द मातोश्रींचे ऐकुनी । कृती आगळी केली महाराजानी । घेती चिंटूबुवांना बोलावुनी । मंत्र म्हणण्या त्यास सांगती ।। २ ।।
तुळशीपत्र ठेविले घरावर । म्हणाले उरले ना स्थावर । आहे ते घेउनी जा सत्वर । जन हो, हवे जे ज्याला ।। ३ ।।

ऐकले हे जमलेल्या लोकांनी । नेले घर सारे लुटोनी ।
म्हणती महाराज हसुनी । माय, नको आता लक्ष संसारी ।।४।।
माय गीताबाईने प्रकार पाहिला । काय बोलावे लेकाला ? ।
गणू, तू गृहस्स्थ नाहीच रे झाला । तू बैरागी एक खरा ।। ५।।
*****
कवी -अरुणदास हा चारितावली लेखनात गुंतला खरा ।।
क्रमशः…
—————————————–
श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-५३ वे
कवी- अरुणदास- अरुण वि.देशपांडे-पुणे
—————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 8 =