You are currently viewing गांधीचे स्वप्न…..

गांधीचे स्वप्न…..

गांधीचे स्वप्न
गांधीच्या स्वप्नातील भारत
आज मार्ग विसरत आहे
सत्य, अहिंसा विसरूनी सारे
जातीयवादामध्ये अडकत आहे
गांधीच्या स्वप्नातील भारत
आज मार्ग विसरत आहे।

अहिंसेचा ‘अ’ निसटुन
सत्यच्या मागे जुळून
देव भूमी रक्तरंजीत करून
स्वार्थाच्या दोरीने लटकत आहे
गांधीच्या स्वप्नातील भारत
आज मार्ग विसरत आहे।

खून, दरोडे आणि लुट
धर्मा धर्मातही पडली आता फूट
माफिया, तस्कर, व्याभिचार
देश अस्मिता संपवत आहे
गांधीच्या स्वप्नातील भारत
आज मार्ग विसरत आहे।

नैतीकताही संपून गेली
पावन चरित्रे नष्ट झाली
दुष्क्रत्याचा एक झंजावात
न्याय देवतेला हलवत आहे
गांधीच्या स्वप्नातील भारत
आज मार्ग विसरत आहे।

इर्शाद शेख
9404598091

This Post Has One Comment

  1. दीपी

    गांधींच्या स्वप्नातील भारत…

    👌👌छान

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =