You are currently viewing कसं कळत?

कसं कळत?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

*कसं कळत?*

कसं कळते पहाट झाली?
डालक्या खालच्या कोंबड्याला
ना घड्याळ ना गजर !
सुरु होते आरवायला **

कसं कळते पहाटे झाली?
झाडावरच्या पक्षाना?
चिवचिवाट तो सुरु होतो
झुंजु मुंजु च्या वेळेला **

कसं कळत गवतावरच्या?
टप टप त्या दवबिंदूला?
कोण जाणे कोठुन कसा
आणुन सडा शिंपडला **

कसं कळत झाडावरच्या?
नाजुकशां कळीला?
नकळत उमलुन येते
पहाटेच्या वेळेला **

कसं कळते पहाट झाली?
उगवत्या सुर्य फुलाला?
नकळत नमन करू लागते
सुर्य नारायणाला **

कसे कळते पहाट झाली
अडाणी माझ्या माऊलीला
घर घर जाते पळु लागते
सुर लागतो ओवीला

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा