अश्रूंची फुला

अश्रूंची फुला

तुझी आठवण माका,
क्षणाक्षणाक येता.
हसणाऱ्या डोळ्यात माझ्या,
तेव्हा पाणी तरारता.

तुझो चेहरो समोर दिसताच,
मी माझे डोळे मिटतय.
तुका नजरेत साठवून घेताच,
ता पाणी गालार ओघाळता.

मनार झालेले जखमे,
असेच असतत न दिसणारे.
कधी भळभळून व्हावतत,
तर कधी…
हसत हसत अश्रूही पिवन टाकतत.

मन मात्र येडा आसता,
त्या आठवणींवर जगता.
न ऱ्हावन स्वतःच पुटपुटता…
“कधी माझ्या अश्रूंची फुला होतीत”.

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा