You are currently viewing सिंधुदुर्गातील वीज कंत्राटी कामगार संघटनेकडून अशोक सावंत यांचा सत्कार…

सिंधुदुर्गातील वीज कंत्राटी कामगार संघटनेकडून अशोक सावंत यांचा सत्कार…

बांदा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगारांना गणेश चतुर्थीपूर्वी वेतन मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.
याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस संदीप बांदेकर, कोषाध्यक्ष मोहन गावडे, जिल्हा उपाध्यक्ष सर्वेश राऊळ, प्रफुल्ल बागवे, सिद्धार्थ मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी माजी खासदार निलेश राणे यांचे देखील आभार व्यक्त केले. तसेच महावितरण अधिकारी व कर्मचारी यांचे सिंधुदुर्ग विज कंत्राटी कामगार प्रतिनिधींनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =