कलमठ बाजारपेठ दहा दिवस बंद राहणार

कलमठ बाजारपेठ दहा दिवस बंद राहणार

कलमठ मधील वाढत्या कोरोना मुळे घेतला निर्णय

कणकवली
कणकवली बाजारपेठे प्रमाणेच कलमठ बाजारपेठ सुद्धा दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. भाजी, मच्छिमार्के, व इतर सर्व प्रकारची दुकाने १ मे पासून दहा दिवस पूर्ण बंद ठेवून कोरोनावर विजय मिळविण्याचा निर्धार आज करण्यात आला.त्यासंदर्भात कलमठ ग्रामपंचायत येथे तातडीची बैठक घेण्यात अली.

या बैठकीला उपसरपंच वैदेही गुडेकर,सदस्य संदिप मेस्त्री, तलाठी सुवर्णा कडुलकर, पोलिस पाटिल संतोष जाधव, सदस्य स्वप्निल चिंदरकर, सचिन बांदिवडेकर, राजू राठोड़, गणेश पुजारे, आरोग्य सेवक चंद्रमणि कदम, धनश्री मेस्त्री, सुरेश वर्देकर,संदिप कदम,अशोक नाईक, विलास गुडेकर उपस्थित होते. दरम्यान बाजारपेठ मधील व्यापारी व इतर दुकानदार यांच्याशी चर्चा केली असता सर्वांनीच सहकार्याची भावना व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा