You are currently viewing सावंतवाडीतील जनतेला होतोय नाहक त्रास

सावंतवाडीतील जनतेला होतोय नाहक त्रास

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपरिषद हद्दीमध्ये जिओ कंपनीने केबल टाकण्यासाठी सर्व रस्त्यांची खोदाई केलेली आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरातील व्यापारी, सर्वसामान्य माणसांना व वाहन धारकांना नाहक त्रास होत आहे. सावंतवाडी शहरातील खोदाई केलेले चर बुजविण्याचे काम चालू आहे. परंतु ते चर चुकीच्या पद्धतीने बुजविले जात आहेत. त्यामुळे रस्ते पुन्हा खराब होण्यास विलंब लागणार नाही.

हे चर पुन्हा एक ते दीड फुटापर्यंत खोदाई करून हातफोडी दगड वापरून व रोलरने दाबून त्यानंतर डांबरीकरण करणे महत्त्वाचे आहे. तसे न केल्यास शहरातील लोकांचा उद्रेक होऊन त्याचा त्रास सावंतवाडी नगरपालिकेला होणार आहे. त्यामुळे ह्या कामावर लक्ष घालून चांगल्या प्रकारे काम करून घ्यावे, असे आवाहन सावंतवाडी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी मुख्य अधिकारी व प्रशासनाला केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा