You are currently viewing जिल्हा कृषी अधिक्षक एस.एन.म्हेत्रे यांचा सत्कार

जिल्हा कृषी अधिक्षक एस.एन.म्हेत्रे यांचा सत्कार

वेंगुर्ला

एम.के.कॉयर फाऊंडेशनच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिक्षक एस.एन.म्हेत्रे यांचा राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला काथ्या औद्योगिक संस्था येथे हा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक एस.एन.म्हेत्रे यांनी गेल्या तीन वर्षात कृषी अधिक्षक म्हणून आणि जिल्हापरिषदेमध्येही फार चांगले काम केले आहे. त्यांच्या कारकीर्दीमध्ये यांत्रिकीकरण, फलोद्यान तसेच प्रक्रिया उद्योग यांसारख्या योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या. त्याचा फायदा सर्वसामान्य, शेतकरी, सहकारी संस्था, उद्योजक यांना झाला आहे. गरीब शेतक-यांना जास्तीत जास्त फायदा होईल, असे त्यांनी काम केले. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिका-यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याला आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कृषीभूषण एम.के.गावडे यांनी केले. यावेळी कृषी उपसंचालक थुटे, आत्माचे कृषी उपसंचालक दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे, महिला काथ्या औद्योगिक संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, तालुका कृषि अधिकारी हर्षा गुंड, विविध संस्थांचे पदाधिकारी, सहकारी संस्था प्रतिनिधी, उद्योजक शेतकरी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 8 =