You are currently viewing कोलगावात एकाची गळफास लावून आत्महत्या

कोलगावात एकाची गळफास लावून आत्महत्या

सावंतवाडी

कोलगाव येथील एका इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. रामचंद्र तुकाराम म्हापसेकर (५४, रा. कोलगांव – म्हापसेकरवाडी ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबतची खबर त्यांचे भाऊ साबाजी म्हापसेकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार डुमिंग डिसोजा यांनी दिली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

मृत रामचंद्र म्हापसेकर हे रिक्षा व्यावसायिक होते. सावंतवाडी शहरात ते रिक्षा चालवायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, पुतणे असा परिवार आहे.

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा