You are currently viewing निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक/ कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांनी ज्या बँकेमधून निवृत्तीवेतन स्विकारत आहेत, त्या बँकेत अथवा जवळच्या जिल्हा कोषागार, उपकोषागार कार्यालयात 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जाऊन हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी संजय गोविंद घोगळे यांनी केले आहे.

ही सुविधा जीवन प्रमाणपत्र या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीनेही उपलब्ध आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत हयातीचा दाखला सादर न केल्यास 1 डिसेंबर पासून हयातीचा दाखला सादर करेपर्यंत निवृत्तीवेतन रोखून धरले जाऊ शकते. त्यामुळे विहित कालावधीत हयातीचा दाखला सादर करावेत. निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी दि. 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक वर्षीच्या नोव्हेंबर अखेर सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालयमार्फत सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांच्या याद्या संबंधित बँकाकडे हस्तांतरीत करण्यात आलेल्या आहेत. ही मोहिम 1 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधित राबविण्यात येत आहे. सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी ते ज्या बँकेतून निवृत्तीवेतन स्विकारत आहेत त्या बँकेच्या शाखेत जाऊन हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी यादीमधील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी. बँकेमध्ये जाताना आपले आधारकार्ड, पॅनकार्ड सोबत घेऊन जावे.

ज्या निवृत्तीवेतनधारकांनी कोषागार कार्यालयास न कळविता परस्पर बँक शाखा बदलली असेल अशा निवृत्ती वेतन धारकानी जिल्ह्यातील नजीकच्या उपकोषागार कार्यालय / कोषागार कार्यालय येथे संपर्क साधावा तसेच ज्या राज्य शासकीय कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे वय वर्षे 80 पूर्ण झाले आहे. अद्याप अतिरिक्त निवृत्ती वेतनाचा लाभ प्राप्त झालेला नाही, अशा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी जन्मदिनांकाचा पुराव्यासह (जसे जन्म दाखला, आधारकार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ. यापैकी एक) निवृत्तीवेतन शाखा, जिल्हा कोषागार कार्यालय सिंधुदुर्ग येथे टपालाव्दारे अथवा ईमेल व्दारे pension1501@gmail.com  अर्ज सादर करण्याचे आवाहनही जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा