You are currently viewing सुकळवाड येथील प्रकाश रामचंद्र आटक यांचे निधन

सुकळवाड येथील प्रकाश रामचंद्र आटक यांचे निधन

अपंगत्वावर मात करून कुटुंबाला दिली होती उभारी

 

सिंधुदुर्ग :

सुकळवाड ठाकरवाडी येथील प्रकाश रामचंद्र आटक (वय ४०) यांचं आज अल्पशा आजाराने निधन झाले. आपल्या अपंगत्वावर मात करून तीनही मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांचं हित पाहिले. शेवटपर्यंत कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे प्रकाश आटक असंख्य संकटांवर मात करून मेहनत घेत. २०१२ साली त्यांच्या लहान भावाचे निधन झाल्याने काही काळ खचून गेलेल्या प्रकाश आटक यांनी कोणत्याही परिस्थितीत न डगमगता पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाला प्रेरणा देऊन जीवनाला उभारी दिली. मात्र काही दिवसांपासून ते आजारी होते. शेवटी आज दुपारी १:३० वा.च्या सुमारास प्रकाश यांची प्राणज्योत मालवली.

प्रकाश यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, वहिनी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण सुकळवाड गावावर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा