You are currently viewing शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी मज्जिद बटवाले

शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी मज्जिद बटवाले

कणकवली

शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत व जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी कणकवली तालुक्यातील मज्जिद अब्बास बटवाले यांची नियुक्ती जाहीर केली.
कणकवली विजय भवन येथे अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी मज्जिद बटवाले यांना उपनेते गौरीशंकर खोत व जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी नियुक्ती पत्र देऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना कणकवली तालुका प्रमुख शैलेश भोगले, कणकवली अल्पसंख्याक सेलचे तालुका प्रमुख निसार शेख,कुडाळ अल्पसंख्याक सेलचे तालुका प्रमुख अश्पाक कुडाळकर, तात्या निकम, रवींद्र तेली, राजा नावळेकर, अब्दुल नावळेकर, राजा म्हस्कर, अरुण बापार्डेकर, महमंद साठविलकर असलम पाटणकर मोसिम मुजावर प्रदीप हरमलकर अजीम नावळेकर अरमान साठविलकर सरताज लांजेकर आदी शिवसेना कार्येकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा