You are currently viewing १० वर्षीय शाळकरी मुलीला शिक्षकाकडून बेदम मारहाण

१० वर्षीय शाळकरी मुलीला शिक्षकाकडून बेदम मारहाण

१० वर्षीय शाळकरी मुलीला शिक्षकाकडून बेदम मारहाण

शिक्षक किशोर गोसावी याच्यावर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल

कणकवली :

तालुक्यातील कासवण येथील शाळा नंबर २ मध्ये असलेल्या एका तिसरी इयत्तेतील १० वर्षीय शाळकरी मुलीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्या शाळेचा शिक्षक किशोर गोसावी याच्यावर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्या शाळकरी मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित शाळकरी मुलीला शाळेत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत म्हणून त्या शाळेतील शिक्षक किशोर गोसावी याने त्या पीडित मुलीच्या पायावर व पाठीवर लाकडी छडीने बेदम मारहाण केली अशी फिर्याद त्या शाळकरी मुलीच्या पालकांनी दिली आहे. ही घटना ३१ जानेवारी रोजी घडल्याचे म्हटले आहे.

याबाबत दाखल तक्रारीनुसार संशयित आरोपी किशोर गोसावी याच्या विरोधात भादवी ३२४ व अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा २०१५ चे कलम ७५ व ८२ नुसार कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून या घटने मुळे पालक वर्गात देखील तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता या घटनेनंतर शिक्षण विभाग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा