You are currently viewing “नाळ नातं”

“नाळ नातं”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”नाळ नातं”*

 

माता लेकराचे नैसर्गिक नाळेच नातं
दोन गोष्टींची नाळ जुळता समतानंदIIधृII

सागराची किनाऱ्याशी मेघांची जळाशी नाळ
वृक्षांची वेलीशी जोडलेली असते नाळ
सूर्याचे प्रकाशाचे उष्णतेचे असते नातंII1II

पती-पत्नींना जुळवावी लागते नाळ
अपत्य माता-पित्यांशी जोडलेली असते नाळ
ह्या हृदयीचे त्या हृदयाशी जुळते नातंII2II

मृदुंगाचे मुख लेपाशी जोडलेली नाळ
संगीताची सुरांशी स्वरांशी जोडलेली नाळ
वाद्यांचे गायकाशी जोडलेलं असते नातंII3II

चंद्राची सागराची जोडलेली असते नाळ
पंचमहाभूतांची सर्वांशी जोडलेली नाळ
प्राणवायूचे सजीवाशी जोडलेले नातII4II

रांगोळीची रंगांशी अन्नाची भूकेशी नाळ
भूमीचे जळाशी जोडलेली असते नाळ
ऋतुंचे सजीवांशी जोडलेलं नातं II5II

कृष्णाची बासरीशी जोडलेली असते नाळ
परमेश्वर भक्तांची असते अव्यक्त नाळ
नेत्रांचे दृष्टीशी जिव्हेचे वाणीशी असते नातII6II

नृत्याची घुंगरूशी जोडलेली असते नाळ
पतंगाचे दोरीशी सुमन सुगंधाशी असते नाळ
गुरु शिष्यांचे जोडलेले असते अमोल नातII7II

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा