You are currently viewing होडी दुर्घटनेतील “त्या” खलाशांच्या नातेवाईकांना शासकीय मदत देणार – दीपक केसरकर

होडी दुर्घटनेतील “त्या” खलाशांच्या नातेवाईकांना शासकीय मदत देणार – दीपक केसरकर

होडी दुर्घटनेतील “त्या” खलाशांच्या नातेवाईकांना शासकीय मदत देणार – दीपक केसरकर

बाबी रेडकर यांची भेट, वेंगुर्ल्यातील मच्छीमारांशी चर्चा…

वेंगुर्ले

येथील समुद्रात झालेल्या होडी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या “त्या” ४ ही खलाशांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत देण्यात येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केली. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर लाँच चालक बाबी रेडकर यांच्या निवासस्थानी श्री. केसरकर यांनी भेट दिली. यावेळी स्थानिक मच्छीमारांच्या पाठिशी आपण राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वादळी वाऱ्यामुळे वेंगुर्ले बंदरात झालेल्या होडी दुर्घटने ४ खलाशांचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना २३ तारखेला रात्री घडली होती. तर तिघांनी पोहोत येऊन किनारा गाठल्यामुळे त्यांचा जीव वाचला होता. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मंत्री केसरकर यांनी आज रेडकर यांच्या घरी भेट दिली. यावेळी दुर्घटनेत मृत्यू पडलेले खलाशी हे अन्य राज्यातील असले तरी त्यांना शासनाकडून मदत दिली जाईल, असा शब्द त्यांनी दिला तसेच या भागाचा आमदार म्हणून येथील मच्छीमारांच्या पाठिशी आपण ठामपणे उभा राहणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे, शहरप्रमुख उमेश येरम, सूरज परब, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा