You are currently viewing सतर्क पोलीस टाईम्सच्या माध्यमातून “कोरोना योद्धा”चा  सन्मान –

सतर्क पोलीस टाईम्सच्या माध्यमातून “कोरोना योद्धा”चा  सन्मान –

सतर्क पोलीस टाईम्सच्या माध्यमातून आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक, सेविका, आशा स्वयंसेविका, महावितरणचे कर्मचारी, जीवरक्षक यांचा “कोरोना योद्धा” म्हणून सन्मान – राजन रेडकर.

निसर्ग व तौक्ते चक्रीवादळात महावितरणचे विद्युत जोडणी करणारे कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय प्रामाणिक कर्तव्याबद्दल सतर्क पोलीस टाईम्सच्या वतीने “कोविड योद्धा” म्हणून केलेला सन्मान हा चांगले काम केलेल्याची पोच पावती – डॉ. प्रविण देसाई, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा.

शिरोडा येथे वेंगुर्ला तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय शिरोडा, प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी, उप केंद्र आरवली, आशा स्वयंसेविक, जीवरक्षक, पोलीस तसेच निसर्ग व तौक्ते चक्रीवादळात महावितरणच्या विद्युत जोडणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोना महामारीच्या काळात विशेष उल्लेखनीय कर्तव्य बजावल्याने त्यांचा सतर्क पोलीस टाईम्सच्या माध्यमातून प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रविण देसाई व डॉ. श्रीमती. देसाई हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असल्याची माहिती सतर्क पोलीस टाईम्स चे सल्लागार संपादक यांनी दिली.
कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, सेविका, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचा तसेच विशेष करून तौक्ते चक्रीवादळात उल्लेखनीय काम केलेल्या महावितरणाच्या विद्युत जोडणी कर्मचाऱ्यांचा सतर्क पोलीस टाईम्स च्या माध्यमातून प्रमाणपत्र देवून केलेला सन्मान, ही त्यांच्या कामाची खरी पोच पावती असून, कोरोनाला असेल तर नागरिकांनी स्वसंरक्षणाकरिता आरोग्यविषयक चाचण्या, लसीकरण व शासनाने घालून दिलेले नियम हे पाळावेच लागणार, असे मत शिरोडा उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रविण देसाई यांनी व्यक्त केले.
कोरोना काळात सिंधुदुर्गातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सर्व आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक सेविका यासर्वांनी तळागाळातील लोकवस्तीत एकत्र येवून केलेलं कार्य हे समाधानकारक असल्याचे मत डॉ. श्रीमती देसाई यांनी केले.
तसेच कोरोना काळात ग्राऊंड लेव्हलला वैद्यकीय चाचण्या करत असतांना डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांना स्थानिक ग्रामस्थांचे जणू आम्ही त्यांचे दुश्मन असल्याची वागणूक देवून, आम्ही काम करीत असतांना नागिरकाकडून आम्हाला खूप शिव्या खाव्या लागतात तसेच सतर्क पोलीस टाईम्स ने केलेल्या सन्मानाबद्दल आरोग्य सेवक आर.बी. पवार यांनी आभार व्यक्त केले.
शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ प्रविण देसाई यांचा वेंगुर्ला तालुका पातळीवर वैद्यकीय कामात केलेल्या उल्लेखनीय कार्याकरिता सतर्क पोलीस टाईम्सच्या वतीने जेष्ठ नागरिक व मार्गदर्शक प्रकाश नवाथे व सुरेश रेडकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
वेंगुर्ला तालुक्यातील कोरोना महामारीच्या काळात उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, प्रार्थमिक आरोग्य केंद्र रेडी येथील आरोग्य अधिकारी व कर्मचारी, उपकेंद्र आरवली येथील आरोग्य सेवक सेविका, शिरोडा, रेडी, केरवाडा, आरवली, मोचेमाड येथील आशा स्वयंसेविका, महावितरणचे विद्युत जोडणी करणारे कर्मचारी, शिरोडा रेडी येथील जीवरक्षक व स्थानिक नागरिक यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. प्रविण देसाई व डॉ. श्रीमती देसाई यांच्या हस्ते “कोरोना योद्धा प्रमाणपत्र” देवून सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी व्यासपीठावर आरवली उपसरपंच श्रीम. रीमा मेस्त्री, नवाथे, सुरेश रेडकर व सतर्क पोलीस टाईम्स चे सल्लागार संपादक राजन रेडकर उपस्थित होते. सतर्क पोलीस टाईम्सच्या वतीने कृष्णा मराठे, जगन्नाथ राणे, रविंद्र राणे, सौरभ नागोळकर, प्रसाद गावडे, राजाराम@ आबा चिपकर, नारायण मेस्त्री, राजेश सातोसकर, आशिष सुभेदार, लक्ष्मीकांत कर्पे, प्रविण भगत, अरुण कांबळी, मुरलीधर राऊळ, विनय@ बाबू मेस्त्री, भूषण मांजरेकर, दिलीप साळगावकर, पृथ्वीराज राणे यांनी हा कार्यक्रम पार पाडण्याकरिता सहकार्य केले त्याकरिता सतर्क पोलीस टाईम्स चे मुख्य संपादक शमशुद्दीन शेख यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबाबत आयोजक राजन रेडकर व त्यांच्या सर्व टीम ने सतर्क पोलीस टाईम्स च्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा