परुळे गावात सुसज्य विलगिकरण कक्ष

परुळे गावात सुसज्य विलगिकरण कक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात  पहिला सुसज्ज 40 बेडचा ग्रामस्तरिय विलगीकरण कक्ष  ग्रामपंचायत परुळेबाजार कार्यक्षेत्रात शाळा परुळे नं 3 व कर्ली शाळे मध्ये सुसज्ज विलगीकरण  कक्षाची स्थापना ग्रामपंचायत सनियत्रंण समिती व लोकसहभागातुन करण्यात आली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 

यावेळी परुळे बाजार सरपंच सौ.श्वेता चव्हाण, उपसरपंच विजय घोलेकर, माजी सभापती निलेश सामंत, माजी सरपंच प्रदीप प्रभू, प्रसाद पाटकर, सदस्य सुनील चव्हाण, मनीषा नेवाळकर, गीतांजली मडवळ, शांताराम पेडणेकर, केंद्रप्रमुख धनंजय चव्हाण, ग्रामसेवक शरद शिंदे, पत्रकार भूषण देसाई, बाबल घोगळे यांजबरोबर ग्रामस्थ उपस्थित  होते. कोंविड सेंटरसाठी लागणा-या मुलभुत सोईसुविधा ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंंचायत सनियंत्रण समितीचे सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ व आरोग्य यंत्रणा यांच्या सहकार्यातुन निर्माण करण्यात आल्या आहेत.

यावेळी माजी सभापती भाजपा जिल्हा चिटणीस श्री निलेश सामंत यांनी कोव्हीड सेंटर साठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत सरपंच यांजकडे सुपूर्द केली. परुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच परुळे सरपंचानी त्याबद्दल त्यांचं विशेष आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा