You are currently viewing वेंगुर्ला-कुबलवाडा येथील भराडीचा १३ रोजी वर्धापनदिन

वेंगुर्ला-कुबलवाडा येथील भराडीचा १३ रोजी वर्धापनदिन

वेंगुर्ला

वेंगुर्ला-कुबलवाडा येथील श्री देवी भराडी देवीचा वर्धापनदिन सोहळा शुक्रवार दि.१३ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.

यानिमित्त सकाळी ८ वाजता पाद्यपूजा, लघुरुद्र व अभिषेक, ९ वाजता कुंकूमार्चन, १०.३० वाजता श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वाजता महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता गोवा भजन मंडळ यांचे संगीत भजन, रात्रौ ८ वाजता जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भराडी प्रासादिक मंडळ, विश्वस्तांतर्फे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा