You are currently viewing स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर शरद पोंक्षे यांचे ४ एप्रिलला मामा वरेरकर नाट्यगृह येथे व्याख्यान…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर शरद पोंक्षे यांचे ४ एप्रिलला मामा वरेरकर नाट्यगृह येथे व्याख्यान…

मालवण

विश्व हिंदू परिषद रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत रामोत्सवाचे आयोजन करते. विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंडाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वावर सावरकर विषयाचे अभ्यासक व जहाल वक्ते सिने नाट्य अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान ४ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता मामा वररेकर नाट्यगृह येथे आयोजित केले आहे.
देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांना परकीय सत्तेने अतोनात छळ करून त्यांचे कुटुंबीय व सहकारी यांना त्रास दिला. हा इतिहास व वस्तुस्थिती असताना स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी देशभक्त सावरकर यांचा सन्मान करण्याऐवजी त्यांच्यावर अनेक प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः काँग्रेस विचारसरणीचा लोकांनी सावरकर यांच्या देशभक्तीवर अनेकवेळा प्रश्न उपस्थित केले. आतातर माफीवीर सावरकर अशा बिरुदावलीने प्रचार आणि प्रसार काँग्रेस विचारसरणी करत आहे.
देशभक्त नागरिकांचा सन्मान व आपली संस्कृती पोषक कार्यक्रमांचे आयोजन करणे हे विश्व हिंदू परिषदेचे धोरण असल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. तरी ४ एप्रिल रोजी मामा वरेरकर नाट्यगृह येथील कार्यक्रमासाठी देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सावरकर विषय समजून घेत पुढच्या पिढीला सावरकर यांचा जाज्वल्य इतिहास जागृत ठेवण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन विश्व हिंदू परिषद मालवणच्या वतीने भाऊ सामंत व संदीप बोडवे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =