You are currently viewing उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४, २५ रोजी सिंधुदुर्गात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४, २५ रोजी सिंधुदुर्गात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४, २५ रोजी सिंधुदुर्गात*

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्त्वाचा*

सावंतवाडी

उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या महिन्यात ते जिल्हा दौऱ्यावर येणार होते, पण तो दौरा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाल्यानंतर त्यांनी राज्यात जनतेचे आभार मानण्यासाठी जिल्हानिहाय जनतेच्या आभारासाठी भेट दौरे सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर ते २४ व २५ एप्रिल रोजी ते सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांची जाहीर सभाही होणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. सावंतवाडी व कुडाळ विधानसभा मतदारसंघाता शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्हयात शिवसेनेची ताकद वाढली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा राजकीय व पक्ष वाढीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिंदे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पुढील आठवड्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटने होणार आहेत, असे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा