You are currently viewing ओटवणे ग्रामपंचायतीत ८२ वर्षाचे दाजी गावकर सरपंचपदी विजयी

ओटवणे ग्रामपंचायतीत ८२ वर्षाचे दाजी गावकर सरपंचपदी विजयी

रवींद्र म्हापसेकर, उमेश गावकरांचा पराभव…

सावंतवाडी

ओटवणे ग्रामपंचायतीवर आत्माराम उर्फ दाजी गावकर हे ८२ वर्षाचे उमेदवार २६० मतांनी सरपंच म्हणून निवडून आले आहेत. त्या ठिकाणी गाव विकास पॅनल म्हणून त्यांनी निवडणूक लढविली. दरम्यान तीस वर्षांपूर्वी त्यांनी एकदा सरपंच पद भूषविले होते. मात्र वयाच्या ८२ व्या वर्षी सुद्धा ते पुन्हा सरपंच म्हणून निवडून आल्याने ही बाब तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

या ठिकाणी गाव विकास पॅनलचे चार सदस्य निवडून आले आहेत. तर उत्कर्ष पॅनलचे पाच सदस्य विजयी झाले आहे. दरम्यान काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र उर्फ बाब्या म्हापसेकर व सरपंच पदाचे उमेदवार उमेश गावकर यांना पराभव सहन करावा लागला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + sixteen =