सावंतवाडीत कुटुंबियांवर झाला पूर्ववैमनस्यातून हल्ला….

सावंतवाडीत कुटुंबियांवर झाला पूर्ववैमनस्यातून हल्ला….

गुळदुवे (ता.सावंतवाडी)

येथील शरद त्र्यंबक शेटकर आणि लग्न होऊन रेडी येथे दिलेली चुलत बहीण सौ. करुणा किसन आरेकर यांच्यात जमिनीच्या हिस्यावरून वाद आहेत. त्यातून सौ. करुणा शेटकर यांचा मुलगा अक्षय किसन शेटकर हा रस्त्याने येता जाता शरद शेटकर यांना हडतुड करतो, याचा जाब विचारण्यासाठी सकाळी सौ. करुणा यांना फोन केल्याच्या रागातून ७ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री ८.०० वाजताच्या सुमारास सौ. करुणा आरेकर व तिचा मुलगा अक्षय किसन आरेकर (वय २५) हे नोव्हेंबर रोजी शरद शेटकर यांच्या घरात घुसले. आणि बेसावध असतानाच शरद शेटकर यांच्या गुढग्यावर अक्षय याने जोरदार लाथ मारली त्यामुळे ते जागीच कोसळले.
अक्षय शेटकर यांच्या सोबत आलेले काही हल्लेखोर लपून बसलेले होते. त्यांनी सुद्धा शरद शेटकर यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एकाने शेटकर यांची पत्नी सौ. सरिता शरद शेटकर यांच्या कानशिलात तीन चार थापट मारत त्यांचे दोन्ही हात पकडून त्यांच्या हातातील चुडा फोडून टाकला. आणि तिलाही लाथा बुक्क्यांनी मारले.त्यांनी संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला. अक्षय आरेकर यांच्या सोबत रेडी गावतळे परिसरातील संदीप आरेकर, सागर राणे, अमोल राणे, रेडकर व राऊळ नामक युवक होते. जाताना तुला बाहेर बघून घेतो अशी धमकी देऊन गेल्याने भविष्यातही या व्यक्तींकडून आपल्या जीवितास धोका असल्याचे शरद शेटकर यांचे म्हणणे आहे.
शरद शेटकर यांनी आपल्या मित्राच्या मदतीने आरोंदा पोलीस चौकी गाठून तक्रार दिली. व पोलिसांच्या सांगण्यानुसार सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात मेडिकल केले. तत्पूर्वी गावातळे येथे जातानाच सौ.करुणा किसन आरेकर व अक्षय किसन आरेकर यांनी शरद शेटकर यांनी आपणास मारहाण केल्याचा तक्रार दिली होती. आरोंदा पोलीस चौकीचे अंमलदार यांनी दोन्ही बाजूची तक्रार नोंद करून पुढील कारवाई सुरू केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा