You are currently viewing परुळे गवाण शाळेला तात्काळ ताडपत्र्यांची व्यवस्था

परुळे गवाण शाळेला तात्काळ ताडपत्र्यांची व्यवस्था

माजी सभापती निलेश सामंत व युवा उद्योजक प्रसाद पाटकर यांच्यातर्फे मदत

 

परुळे :

 

वेंगुर्ले तालुक्यातील प्राथमिक शाळा परुळे गवाण शाळेची इमारत नादुरुस्त असल्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना खूप नाहक त्रास सहन करावा लागतो. शाळेत सगळीकडे पावसामुळे गळती सुरू असल्यामुळे मुले शाळेत बसू शकत नाहीत. ही बाब येथील माजी सभापती निलेश सामंत व युवा उद्योजक प्रसाद पाटकर यांना समजताच त्यांनी तात्काळ शाळेसाठी ताडपत्र्यांची व्यवस्था करून दिली. या ताडपत्र्या मुख्याध्यापिका अंजली घोलेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उर्मिला लांबर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी उद्योजक प्रसाद पाटकर, सुनील चव्हाण, श्रीपाद सावंत यासह पालक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =