You are currently viewing कांदळगाव रामेश्वर मंदिरात माजी खा. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त लघुरुद्र

कांदळगाव रामेश्वर मंदिरात माजी खा. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त लघुरुद्र

मालवण :

 

भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जि प अध्यक्ष, भाजप सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कांदळगाव येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात गणेश पूजन, अभिषेक, लघुरुद्र करण्यात आले.

दरम्यान, जनतेला सुखसमृद्धी, निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करत येत्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून निलेश राणे मोठया मताधिक्याने आमदार होऊदे. असे गाऱ्हाणे रामेश्वर चरणी उपस्थितांच्या वतीने घालण्यात आले.

निलेश राणे यांचा वाढदिवस मालवण भाजपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी तालुक्यात साजरा करण्यात येत आहे. सकाळी कांदळगाव येथे श्रीदेव रामेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रम करून दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, महेश मांजरेकर, भाई मांजरेकर, निलेश खोत यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + twelve =