आघाडी सरकार विरोधात मनसे पुन्हा आक्रमक

आघाडी सरकार विरोधात मनसे पुन्हा आक्रमक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग चे माजी आमदार परशुराम (जिजी) उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे आंदोलन करणार

कणकवली / प्रतिनिधी :-

सुस्त सरकारला जाग आणून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे मनसे आंदोलन असणार आहे. काही दिवसांपूर्वी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराविरोधात आक्रोश आंदोलन केले हे आंदोलन जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या बाबत जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकिस्तक यां कडून अयोग्य पद्धतीने काम सुरू आहे, रॅपिड टेस्ट बाबत विश्वासहर्ता नसताना या टेस्ट वर भर दिली जात असून त्यामधून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यानंतर शासकीय रुग्णालय तसेच तालुकानिहाय कोव्हिड सेंटर यांच्याकडे होणारे दुर्लक्ष, तेथील रुग्णांची होणारी गैरसोय, खरेदीतील घोटाळा, चढ्या दारांच्या निविदा, तसेच उपसंचालक पातळीवर नर्सेसच्या बदल्या यामध्ये सुरू असलेले गैरव्यवहार या पार्श्वभूमीवर मनसेच्यावतीने जिल्हा रुग्णालया समोर आंदोलन केले होते.

त्याच प्रमाणे परशुराम (जिजी) उपरकर यांनी येत्या 10 सप्टेंबरला सुस्त सरकारला जाग आणून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यकारी अभियंता कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली येथे सकाळी 10.00 वाजता आंदोलन करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा