You are currently viewing भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन

सावंतवाडी:

 

भाजपाचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबरला होत आहे. या पार्श्वभूमीवर ९ ते १५ ऑक्टोंबर या काळात विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या संदर्भात २७ सप्टेंबर रोजी शिल्पग्राम सावंतवाडी येथे सकाळी १०.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेस सर्व डिजिटल चॅनल, वर्तमान पत्र, वृतवाहिनी, सोशल मीडिया प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब व विशाल फाऊंडेशनच्या माध्यमातून केले आहे. या पत्रकार परिषदेत विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची घोषणा संजू परब करणार आहेत. पत्रकार परिषदेला संजू परब यांच्या समवेत भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा