You are currently viewing एक सही संतापाची; मनसेचे कुडाळात अभिनव आंदोलन

एक सही संतापाची; मनसेचे कुडाळात अभिनव आंदोलन

कुडाळ

एकदा मतदान झालं की पाच वर्षे मतदाराला गृहीत धरून सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणाला लोकप्रतिनिधी संख्या वाढवण्या च्या नादात झालेला चिखल या विरोधात सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून आणि सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक श्री.गजानन राणे आणि सरचिटणीस श्री.संदीप दळवी यांच्या सूचनेनुसार आज सिंधुदुर्ग मनसेच्या वतीने कुडाळ बस स्टँड परिसर येथे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या उपस्थितीत एक सही संतापाची हे अभिनव आंदोलन करण्यात आले..या वेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या सह्या करत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला..

यावेळी उपस्थित माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, एस. टी.सेना राज्य सरचिटणीस बनी नाडकर्णी,माजी मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,माजी तालुकाध्यक्ष सचिन सावंत,माजी जिल्हा सचिव बाळा पावसकर,हेमंत जाधव,जगन्नाथ गावडे,प्रथमेश धुरी,सागर सावंत,गजानन राऊळ,शुभम धुरी,वैभव परब,यतीन माजगावकर,हरीश गुंजाळ,विकास लाड,अजय जोशी,सर्वेश ठाकूर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा