You are currently viewing शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आंबोली येथे पर्यटकांशी साधला संवाद..

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आंबोली येथे पर्यटकांशी साधला संवाद..

सावंतवाडी:

 

‘काय काय पाहीलंत… कसं आहे इथलं पर्यटनस्थळ… आपल्या काही सूचना आहेत का…’ शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या दौऱ्या दरम्यान आंबोली येथील नांगरतास पाईंट व कावळेसाद पॉईंटवर आलेल्या पर्यटकांशी संवाद साधला.

शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात आंबोली येथून केली. या दौऱ्या दरम्यान पर्यटन स्थळानजिक महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या वतीने नियोजित सुविधांबाबत स्थळ पाहणी करुन शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी आढावा घेत विविध सूचना केल्या.

नांगरतास पॉईंट, कावळेसाद येथे मुंबई, नवी मुंबई, नाशिक या भागातून आलेल्या पर्यटकांशी संवाद साधत त्यांनी विचारपूस केली. त्याशिवाय पर्यटक म्हणून आलेल्या सूचनांचे स्वागतही त्यांनी केले.

त्या सूचनांवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या समक्ष दिले. यानंतर पर्यटकांनी आनंदाने मंत्री महोदयांच्या सोबत छायाचित्र आणि सेल्फीचा आनंद घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा