अर्जुन रावराणे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नादकर यांना शिक्षक सेनेचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त

अर्जुन रावराणे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नादकर यांना शिक्षक सेनेचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त

वैभववाडी

अर्जुन रावराणे विद्यालय व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नादकर बी एस यांना महाराष्ट्र राज्य शिक्षकसेनेचा वैभववाडी तालुक्यातून आदर्श मुख्याध्यापक म्हणून सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून कार्यरत असणारी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा कोकण विभागाचा राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 21 /02 /2021 रोजी ओरस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी विविध शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते अतुलजी रावराणे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोकण विभाग अध्यक्ष मा. श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन तर्फे, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकसेना संघटनेचे अध्यक्ष कमलेश गोसावी, संघटक श्री पप्पू ताम्हणकर तसेच संघटनेचे पदाधिकारी, गुणवंत शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .श्री नादकर भास्कर शंकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे स्थानिक अध्यक्ष जयेंद्र दत्‍ताराम रावराणे, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी पालक तसेच वैभववाडी तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा