You are currently viewing मालवण वायरी मोरेश्वरवाडी येथे घराला आग लागून मोठे नुकसान

मालवण वायरी मोरेश्वरवाडी येथे घराला आग लागून मोठे नुकसान

स्थानिकांच्या मदतीने आग नियंत्रणात

मालवण

वायरी मोरेश्वरवाडी टिकम शाळेनजीक राहणाऱ्या श्रीकृष्ण वसंत मणचेकर यांच्या घराला बुधवारी सकाळी आग लागली. आगीत घराची पडवी व घराचा काही भाग, छप्पर घरातील साहित्य, मासेमारीचे साहित्य, हातगाडीसह अन्य साहित्य जळाले. नगरपालिका अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत मणचेकर कुटुंबीयांनी स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले होते. आगीत मणचेकर कुटुंबीय यांचे मोठे नुकसान झाले आहे.मणचेकर यांच्या घरामागील पडवीच्या बाजूला पाणी तापविण्यासाठी असलेल्या ठिकाणी अचानक आग भडकली. आजूबाजूच्या साहित्याने पेट घेतला.

हातगाडी चालवून उदरनिर्वाह करणारे श्रीकृष्ण मणचेकर हे कामानिमित्त बाहेर होते. घरात दोन मुली व पत्नी होती. माहिती मिळताच श्रीकृष्ण घरी पोहचले. स्थानिकांनीही धाव घेत. मदतकार्य केले. दरम्यान माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी मालवण पालिका प्रशासनास माहिती देत अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवला. अग्निशमन द्वारे काही ठिकाणी धुमसत असलेल्या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आले. वायरी सरपंच भाई ढोके तसेच अन्य ग्रामस्थ यांनी धाव घेत मदतकार्य केले. महसूल प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा