You are currently viewing विघ्नेश्वर

विघ्नेश्वर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*विघ्नेश्वर*

ओढ तुझ्या दर्शनाची
धाव घेती भक्तजन
मनोहर रूप तुझे
प्रफुल्लीत झाले मन

गौरी शंकर गणेश
शोभे मखरात मूर्ती
डोळे भरून पाहता
जागतसे मनी स्फूर्ती

तुझ्या कृपेच्या पुष्पांचा
सडा पडो भूमीवर
विनायका मोरेश्वरा
माया तुझी भक्तांवर

धूप दीप ओवाळून
घेऊ दर्शन बाप्पाचे
दुर्वा फुले माळ वाहू
पिऊ तीर्थ चरणाचे

अधिपती विद्येचा हा
वक्रतुंड गजमुख
विघ्नेश्वर गणपती
देई सकलांस सुख

*✒️© सौं . आदिती धोंडी मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =