You are currently viewing माहेश्वरी युथ फौंडेशनच्या वतीने खेळाडूंना सायकल प्रदान

माहेश्वरी युथ फौंडेशनच्या वतीने खेळाडूंना सायकल प्रदान

इचलकरंजी येथे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून माहेश्वरी युथ फौंडेशनच्या वतीने माय सायकल उपक्रमांतर्गत
कबड्डीसह खो – खो खेळातील गरजू खेळाडूंना सायकल प्रदान करण्यात आल्या.

माहेश्वरी युथ फौंडेशनच्या वतीने सामाजिक व धार्मिक कार्यात पुढाकार घेतला जात़ो.यासह विविध विधायक उपक्रम देखील सातत्याने राबवण्यात येतात.याच अनुषंगाने माय सायकल उपक्रमांतर्गत समाजातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना सायकल प्रदान करण्यात येतात.घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असूनही अभ्यासाबरोबरच कबड्डी,खो -खो खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी काही विद्यार्थीनी धडपड करत आहेत.त्यांना या कार्यासाठी पाठबळ मिळावे ,या उद्देशाने माहेश्वरी युथ फौंडेशनच्या वतीने गणेशचतुर्थीचे औचित्य साधून प्रांजल पोवार ,जुबेन मुल्ला , श्रध्दा खामकर या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सायकल प्रदान करण्यात आल्या.यावेळी फौंडेशनचे
रामेश्वरलाल बांगड , वासुदेव बांगड ,राजू बांगड ,वरुण बांगड , संतोष बाहेती , महेश बाहेती , सुनील बांगड , अभिषेक परतानी , शैलेंद्र बिडला ,शरद झंवर ,शेखर बांगड , गोपाल चांडक ,बालाप्रसाद भुतडा ,अरुण बांगड यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.या सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा