You are currently viewing मुस्लिम हेल्थ अँड वेल्फेअर फाऊंडेशनचा बेबी कोळेकर यांना मदतीचा हाथ …

मुस्लिम हेल्थ अँड वेल्फेअर फाऊंडेशनचा बेबी कोळेकर यांना मदतीचा हाथ …

सामाजिक बांधिलकी ने केले आव्हान; रमजान ईदचे औचित्य साधून घर दुरुस्तीसाठी केली आर्थिक मदत

सावंतवाडी

काही दिवसांपूर्वी सामाजिक बांधिलकी या संस्थे मार्फत बेबी कोळेकर यांच्या घर दुरुस्ती व छपरासाठी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील मुस्लिम हेल्थ अँड वेलफेअर फाउंडेशन या संस्थेने रमजान ईद सणाचे औचित्य साधून आर्थिक मदत केली. सर्व धर्म समभाव व मानवतेचा धर्म हा सर्वश्रेष्ठ असतो व आपल्या सावंतवाडीची एकता अबाधित राखत सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमास रमजान ईद चे औचित्य साधून दहा हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला.

त्याच प्रमाणे जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेज व छपरासाठी एक रेजीस देण्यात आल्या सामाजिक बांधिलकी च्या वतीने मुस्लिम फाऊंडेशनचे आभार मानण्यात आले व आम्ही सर्व धर्मीय एकत्र आहोत असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी सावंतवाडी मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेब बेग , उपाध्यक्ष हिदायतुल्ला खान, सचिव सलीम मुल्ला, सहखजिनदार मोहसीन मुल्ला, तब्रेझ बेग, सहसचिव रिजवान पटेल, खजिनदार ताजुद्दीन शेख, फारुक शेख, आसिफ शेख, कैस नदाफ, आसीम पीर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 14 =