You are currently viewing प्रतिष्ठापना

प्रतिष्ठापना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*प्रतिष्ठापना*

गजानना रे गणनायका
नमन माझे तव चरणी
अवतरलासी धरेवरी तू
घर माझे गेले उजळोनी ||

लखलख दीप घरी तेवती
उत्साहाला येई भरती
दिव्य चेतना मना लाभते
झंकारती स्वर पैंजणातूनी
घर माझे गेले उजळोनी ||

दर्शन होता तुझे लाभली
अपार शांती मनामनासी
कृपा हस्त तू शिरी ठेवीसी
मार्ग मिळू दे संकटातूनी
घर माझे गेले उजळोनी ||

देवघरा आली किती शोभा
प्रसन्न करते दिव्य प्रभा
आनंदाला भरते येऊनी
मन रमले रे तुझ्या पूजनी
घर माझे गेले उजळोनी ||

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =