You are currently viewing नामाचा जागर

नामाचा जागर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल लिखित अप्रतिम भक्तीगीत*

*”नामाचा जागर”*

रुप पाहता विठ्ठला कंठी येती सूर
राम कृष्ण हरी करू नामाचा गजर!!ध्रु!!

वाहतो पुष्पांजली हृदयांपासून
स्वीकार करावा घडो सगुण दर्शन
वात्सल्य मूर्ती पहाता येई भरून उर!!1!!

सुमन सुरांचा येतो मधुर सुगंध
निमिशात वातावरण जाई भारावून
आलाप छंद घेता मन होई विभोर!!2!!

भक्तांसाठी उभा युगे अठ्ठावीस तिष्ठत
देव संतांचा वास जाणवे अणुरेणुंत
पंढरीत चाले नाम गजर प्रेमाचा पूर!!3!!

कृतज्ञ शरण आम्ही देवा द्यावे भक्ती प्रेम
विठुराया कृपा करा येऊ दे मुखी नाम
टाळ मृदुंगे गाऊ अभंग आनंदा पूर!!4!!

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + one =