You are currently viewing आपली मराठी

आपली मराठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित मराठी भाषा गौरव दिन विशेष कविता*

 

*आपली मराठी*

———————————————–

हे मराठी माणसा,ऐक ना

व्यवहारी भाषा योग्य जरी

घरात वावरावी मराठी खरी

तिला तू विसरु नकोस ना…

 

मायमराठीचा गौरव आता

त्रिभुवनी होई जरी साजरा

बाहेर बोलण्याची वेळ येता

का घेशी हिंग्लिशचा आसरा ..

 

ज्ञानेश सांगे महती मराठीची

कविता वाचावी कविजनांची

मराठी आमची अभिमानाची

मिरवावी पताका या मराठीची..

 

माय-लेकरांनी बोलावी मराठी

सांगणे, मागणे असावे मराठी

ठसक्यात बोलु आपली मराठी

मराठी घरात असावीच मराठी ..

 

हे मराठी माणसा,हे ऐकना ।

———————————————

कविता- आपली मराठी

कवी- अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342

————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =