*आजची कामगार चळवळ दुर्बळ : उल्हासदादा पवार*
*समाजाला ऊर्जा देणारास बळ द्या: उल्हासदादा पवार*
पिंपरी :
“कामगार हा आपल्याच मर्यादेत न राहता नेहमी संस्थेची काळजी करत असतो. पण बदलते कायदे कामगारांच्या हिताचे नसल्यामुळें त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. चांगले काम करणाऱ्याला जास्त संघर्ष करावा लागतो. आजच्या कामगार चळवळीत अनेक प्रवाह असल्यामुळे आपापसात वैचारिक लढाई सुरू असते. त्यामुळे कामगार चळवळ दुर्बळ झाली आहे. सत्याग्रही मार्गाने चळवळ चालवणे अवघड झाले आहे. समाजकारण, राजकारण यात सुसंस्कृतपणा हरवला आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजाला विधायक ऊर्जा देणाऱ्याच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.” असे प्रतिपादन जेष्ठ नेते आणि माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी केले आहे.
पिंपरी येथील ऑटो क्लस्टर सभागृहात एच ए कामगार लढ्याची यशोगाथा असलेल्या “गाथा संघर्षाची” या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांचे आत्मकथन असलेल्या आणि दादाभाऊ गावडे यांच्या लेखणीतून साकार झालेल्या “गाथा संघर्षाची ” या पुस्तकाचे प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर, मानव कांबळे , डॉ. कैलास कदम, माजी महापौर संजोग वाघेरे, दिलीप पवार, मारुती भापकर आदी उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. कैलास कदम यांनी केले.
कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांनी कामगार चळवळीतील सहकाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत, उद्याच्या पिढीला संघर्षाची व अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी आत्मकथन पुस्तक रुपी ठेवा अर्पण केला आहे, असे सांगितले. लेखक दादाभाऊ गावडे म्हणाले की, “कामगारांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी पुस्तक उपयोगी पडेल”.
कॉ. अजित अभ्यंकर व सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनीही आपल्या मनोगतात कामगार चळवळीची दशा आणि दिशा यावर प्रकाश टाकला.
प्रमुख उपस्थितांच्या मध्ये सोपान खुडे, प्रभाकर ओव्हाळ, राजेंद्र घावटे, विजय लोखंडे, तात्यासाहेब शितोळे, विजय पाटील, अनिल रोहम, संभाजी शिंदे आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे संयोजन इंद्रायणी साहित्य परिषदेच्या संदीप तापकीर, डॉ. सीमा काळभोर, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, रामभाऊ सासवडे, दामोदर वहिले, तेजस्विनी देशमुख आदींनी केले.
सूत्रसंचालन दिगंबर ढोकले यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी केले.
शब्दांकन : राजेंद्र घावटे
(8888434331)
*संवाद मीडिया*
*🚗 करिअरची सुवर्णसंधी! 🚗*
*माई ह्युंदाई (Mai Hyundai)*
*27 वर्षांचा विश्वास • सततची प्रगती • उज्ज्वल भविष्य*
* माई ह्युंदाई (Mai Hyundai) तर्फे कुडाळ आणि कणकवली येथील शोरूमसाठी उत्साही आणि कुशल उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
*📌 उपलब्ध पदे:*
*▪️ सेल्स एक्झिक्युटिव्ह*
*▪️टीम लीडर*
*▪️सर्व्हिस ॲडव्हायझर*
*▪️CRM (सेल्स)*
*▪️CRM (सर्व्हिस) मॅनेजर*
*👉🎓 पात्रता:*
*पदवीधर / डिप्लोमा / पदवीधर उमेदवार*
*अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात*
*💼 सुविधा:👇*
*✔ प्रोव्हिडेंट फंड (PF)*
*✔ ग्रॅच्युटी*
*✔ वार्षिक बोनस*
*✔ मासिक इन्सेंटिव्ह*
*✔ ट्रॅव्हलिंग भत्ता*.
*📍 कामाचे ठिकाण:*
*Mai Hyundai*
*वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड, वागडे, कणकवली*
*Mai Hyundai, उद्योगनगर, मुंबई-गोवा महामार्ग, कुडाळ*
*📅 अर्ज कसा कराल?👇*
*👉 इच्छुक उमेदवारांनी सविस्तर बायोडेटा व फोटोसह*
*🕙 सकाळी 10 ते 🕕 संध्याकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष भेट द्यावी*
*📞 संपर्क:*
*📱 74100 06037*
*📧 tmsnd@maihyundai.in*
*✨ 27 वर्षांचा विश्वास – Mai Hyundai सोबत उज्ज्वल करिअर घडवा! ✨*
*(नियम व अटी लागू)*
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/202054/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
